मानवी मूल्यांची जोपासना करून व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:31+5:302021-07-23T04:22:31+5:30

आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ...

Personality should be shaped by cultivating human values | मानवी मूल्यांची जोपासना करून व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा

मानवी मूल्यांची जोपासना करून व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा

आरमाेरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडा विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग, गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा हाेते.

आठ दिवसीय कार्यशाळेत विविध विषयांवर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यशस्वीतेसाठी रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के, प्रा. सीमा नागदेवे, शारीरिक शिक्षण, खेळ व क्रीडाप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. गजानन बोरकर, तसेच तंत्रसहायक प्रा. सुनील चुटे यांनी सहकार्य केले.

(बॉक्स)

जगण्याचे कौशल्यही आत्मसात करावे

डाॅ. खालसा यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमिक शिक्षण घेत असताना जीवनव्यवहारात जगण्याचे कौशल्यदेखील आत्मसात करावे, असे म्हटले. कुरखेडाच्या श्री. गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व’ या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

Web Title: Personality should be shaped by cultivating human values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.