दिव्यांगांना मिळणार मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:33+5:30

तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, ५ मे रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात केले होते.  पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या पुढाकाराने आणि अलिस्को कंपनी - मुंबई, जनरल इन्श्युरन्स कंपनी - मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या दिव्यांग तपासणी शिबिरात जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील ३१६ दिव्यांगांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी २६० दिव्यांग नागरिक हे कृत्रिम अवयव उपकरणासाठी पात्र ठरले आहेत. 

People with disabilities will receive free prostheses and equipment | दिव्यांगांना मिळणार मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे

दिव्यांगांना मिळणार मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागातील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. गरजू आदिवासी नागरिकांना तो लाभ मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून मोफत कृत्रिम अवयव वाटप केले जाणार आहे. त्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, ५ मे रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात केले होते. 
पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या पुढाकाराने आणि अलिस्को कंपनी - मुंबई, जनरल इन्श्युरन्स कंपनी - मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या दिव्यांग तपासणी शिबिरात जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील ३१६ दिव्यांगांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी २६० दिव्यांग नागरिक हे कृत्रिम अवयव उपकरणासाठी पात्र ठरले आहेत. 
ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपकरणाची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ते अवयव व उपकरणे मोफत मिळवून देण्यात येणार आहेत. यावेळी दिव्यांग नागरिकांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, आम्ही जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.
या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (नक्षल ऑपरेशन), अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, कमलेश यादव सी.एस.आर. कन्सल्टंट मुंबई, डॉ. सतीश गोगुलवार संयोजक, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी भावेश कावरे व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

२४७३ जणांना रोजगार, २७३७ जणांना प्रशिक्षण
-    आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून ९८० दिव्यांगांना यूआयडी कार्ड, ६५० दिव्यांगांना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, २७६ जणांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक, नर्सिंग असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिशिअन, प्लम्बिंग, वेल्डिंग, जनरल ड्युटी असिस्टंट, फील्ड ऑफिसर अशा एकूण २४७३ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

Web Title: People with disabilities will receive free prostheses and equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस