नाल्यातील दूषित पाण्यावर काेपेेलावासीय भागवितात तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:16+5:302021-01-10T04:28:16+5:30
काैसर खान सिराेंचा : तालुक्याला लागून वाहणाऱ्या प्राणहिता, गाेदावरी व इंद्रावती या नद्यांवर तेलंगणा सरकारच्या वतीने प्रकल्प उभारण्यात आले ...

नाल्यातील दूषित पाण्यावर काेपेेलावासीय भागवितात तहान
काैसर खान
सिराेंचा : तालुक्याला लागून वाहणाऱ्या प्राणहिता, गाेदावरी व इंद्रावती या नद्यांवर तेलंगणा सरकारच्या वतीने प्रकल्प उभारण्यात आले आहेत. सिंचन, उद्याेग निर्मितीसह पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पाेचमपल्लीनजीक लक्ष्मी बॅरेज व सिराेंचालगत कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे प्राणहिता व गाेदावरी नदीचे पाणी तेलंगणा राज्याच्या घराेघरी पाेहाेचत आहे. दुसरीकडे सिराेंचा तालुक्यात पाणी टंचाईची माेठी समस्या निर्माण झाली आहे. सिराेंचा तालुक्यातील नागरिक नाले व खड्ड्यांमधील दूषित पाण्यावर तहान भागवित आहेत.
सिराेंचा तालुक्याला वेढा घातलेल्या गाेदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीवर महाराष्ट्र शासनाला एकही पाणी व सिंचन उपसा याेजना उभारता आली नाही. बारमाही वाहणाऱ्या नद्या असून काेणताही सिंचन प्रकल्प नाही. काही भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. झिंगानूर परिसरात उन्हाळ्यात माेठे पाणी संकट निर्माण हाेते. पाणीटंचाईने नागरिक त्रस्त हाेतात. दरम्यान, सिराेंचा तालुक्यातील काेपेला या गावातील नागरिक दूषित व गढूळ पाणी पिऊन आपली तहान भागवित असतात.
उन्हाळ्यात या भागातील पिण्याच्या पाण्याची पातळी प्रचंड खालावते. काेपेला गावची लाेकसंख्या ३५० इतकी आहे. एका नाल्यात लहान-लहान खड्डे करून त्या खड्ड्यातून पिण्याचे पाणी आणावे लागते. गावात हातपंप आहेत. मात्र उन्हाळ्यात ते निकामी हाेतात. सिराेंचा तालुक्यातील नद्यांचे पाणी तेलंगणाच्या ४०० किमी दूर ३१ जिल्ह्यांमध्ये पाेहाेचविले जाते तर दुसरीकडे सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर व बऱ्याच भागात उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवते. अतिशय आवश्यकता असलेल्या गावांसाठी राज्य सरकारने उपसा सिंचन याेजना मंजूर करून ती कार्यान्वित करावी, अशी मागणी तालुक्यात टंचाई जाणवत असलेल्या गावातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स...
तेेलंगणा सरकारकडून काेेट्यवधींच्या याेजना पूर्ण
मेडीगड्डा बॅरेजला ८५ गेट असून या बॅरेज निर्मितीवर १८.४९ काेटी रुपयांचा खर्च झाला आहे. १६.१७ टीसीएमसी पाणी साठवणूक क्षमता असून या याेजनेचे सन २०१६ मध्ये काम सुरू झाले व २१ जून २०१९ पूर्ण झाले. कालेश्वर उपसा सिंचन याेजनेवर १.२ लाख काेटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या याेजनेचे काम जून २०१९ मध्ये पूर्ण झाले. दाेन्ही याेजना एकमेकाशी संलग्नित आहेत. १०० ते ६०० मीटरपर्यंत पाण्याचा उपसा करून हे पाणी ३१ जिल्ह्यांमध्ये ४०० किमीपर्यंत पाेहाेचविण्याचे काम केले जात आहे. सिराेंचापासून २६१ किमी अंतरावर असलेल्या हैदराबाद शहरातील एका कुटुंबाला दर महिन्याला २० हजार लिटर पाणी पुरवठा करण्याचे काम या याेजनेतून सुरू आहे. ३० टीसीएमसी इतके पाणी हैदराबाद महानगरपालिकेला पुरविले जात आहे.