पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला पीसीआर
By Admin | Updated: July 11, 2017 00:38 IST2017-07-11T00:38:17+5:302017-07-11T00:38:17+5:30
एका प्रादेशिक वृत्तपत्राचे देसाईगंज तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर शनिवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ....

पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला पीसीआर
देसाईगंजातील प्रकरण : संघटना आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एका प्रादेशिक वृत्तपत्राचे देसाईगंज तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर शनिवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर देसाईगंजच्या तालुका व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सोमवारी न्यायालयाने आरोपी क्षितीज कमलेश उके याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्रकार मेश्राम यांच्या दोन्ही पायला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही पायाचे हाड फॅक्चर झाल्याचा प्राथमिक अहवाल अस्थिरोगतज्ज्ञांनी दिला आहे. क्ष-किरण तज्ज्ञाचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. एकूणच पत्रकार किशोर मेश्राम याला जीवानिशी ठार मारण्याचा आरोपीचा बेत होता, असे या घटनेवरून उघड झाले आहे. आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे.