दाेन दिवसांपैकी एक दिवसाचे वेतन जिल्ह्यासाठी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:04+5:302021-05-12T04:38:04+5:30
राज्यात काेराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे, तर दुसरीकडे शासनाला आराेग्यावर माेठ्या प्रमाणात खर्च करावा ...

दाेन दिवसांपैकी एक दिवसाचे वेतन जिल्ह्यासाठी द्या
राज्यात काेराेनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे, तर दुसरीकडे शासनाला आराेग्यावर माेठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. काेराेनाचे संकट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याने, पुन्हा खर्च करावाच लागणार आहे. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एक किंवा दाेन दिवसांचे वेतन कपात करून, ते आराेग्य सुविधांसाठी खर्च करावे, अशी मागणी केली हाेती. त्यानुसार, राज्य शासनाने ७ मे राेजी शासन निर्णय घेतला आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांचे दाेन दिवसांचे वेतन कपातीचा निर्णय झाल्यास एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत तर एक दिवसाचे वेतनी जिल्हा निधीत जमा करावे. गडचिराेली जिल्ह्यातही काेराेनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठीही निधीची गरज असल्याने गडचिराेली जिल्ह्यातील एक दिवसाचे वेतन जिल्हा निधीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आराेग्यसेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे यांनी केली आहे.