शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

२०० रूपये दंड भरा, जिल्ह्यात प्रवेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

बाहेरून विनापरवाना येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस नियुक्ती असते. तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधित व्यक्तीकडून ५ हजार रूपये दंड व ज्या वाहनाने प्रवेश करेल त्या वाहनावर एक लाख रूपये दंड ठोठावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देदेसाईगंजच्या नाक्यांवरील प्रकार । जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात विनापरवाना प्रवेशास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली आहे. मात्र देसाईगंज तालुक्यातील नाक्यांवरून केवळ २०० रूपये दंडाची पावती भरून खुशाल प्रवेश मिळत आहे. महसूल विभागाच्या या कारनाम्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात बाहेरून आलेल्या रूग्णांमुळेच कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे बाहेरून विनापरवाना येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक सीमांवर नाके उभारण्यात आले आहेत. या नाक्यांवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस नियुक्ती असते. तसेच विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास संबंधित व्यक्तीकडून ५ हजार रूपये दंड व ज्या वाहनाने प्रवेश करेल त्या वाहनावर एक लाख रूपये दंड ठोठावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.देसाईगंज तालुक्याला गोंदिया, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमधून देसाईगंज तालुक्यात प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी पोलीस व महसूल विभागातर्फे चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. विनापरवाना प्रवेश करणाºयावर याच चेकपोस्टमार्फत २०० रूपये दंड ठोठावून सोडून दिले जात आहे. विशेष म्हणजे २०० रुपये भरा व प्रवेश करा, असे धोरण या ठिणावरून सुरू झाले असल्याने अवैध प्रवेश करणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली आहे. २०० रूपये दंड भरून याच मार्गाने अधिकारी, कर्मचारी दररोज ये-जा करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशही पायदळी तुडविला जात आहे.थकबाकीच्या नावाखाली दंडदंड ठोठावण्यात येत असलेल्या व्यक्तीला पावती दिली जात आहे. या पावतीवर गाव नमुना-९ असे लिहिण्यात आले आहे. थकबाकी म्हणून २०० रूपये वसूल केले जात आहेत. या पावतीवर नेमके २०० रूपये वसुलीचे कारण सांगण्यात आले नाही. तसेच शिक्कासुद्धा मारला जात नाही. केवळ सही केली जाते.चेकपोस्टवर महसूल विभागातर्फे बुक ठेवण्यात आले आहे. या बुकमधील पावत्या दंड वसुलीसाठी वापरल्या जात आहेत. याबाबत तक्रारी होत असल्याने त्या पावत्या देणे बंद करण्याचे निर्देश देणार आहे.- दीपक गुट्टे,तहसीलदार, देसाईगंज

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या