कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या
By Admin | Updated: June 21, 2014 23:58 IST2014-06-21T23:58:43+5:302014-06-21T23:58:43+5:30
अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच एटापल्ली तालुक्यातील तुमडी येथील सेवाआश्रमच्या पटांगणावर घेण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात अंगणवाडी

कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या
अंगणवाडी महिलांची : तुमडी येथील मेळाव्यात मागणी
गडचिरोली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा नुकताच एटापल्ली तालुक्यातील तुमडी येथील सेवाआश्रमच्या पटांगणावर घेण्यात आला. निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आलेल्या मेळाव्यात अंगणवाडी महिलांना किमान वेतन मिळाले पाहिजे, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी एकमताने शासनाकडे केली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माया शेडमाके होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रमेशचंद्र दहीवडे, विजय चौधरी, सुधाकर बावणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माया शेडमाके यांनी केले. त्यांनी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नाबाबत माहिती देतांना म्हटले की, दुर्गम भागातही अंगणवाडी कर्मचारी सेवा देत आहेत. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे मानधन हे सेवेच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची गरज आहे, असे सांगितले. मानधन वाढ तसेच पेंशनच्या प्रश्नाला घेऊन सतत एक महिना अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संघर्ष केला. शासन बोगस घोषणा देत असेल तर त्यांना धडा शिकवा, असे डी. एस. वैद्य यांनी सांगितले. अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने ३१ महिला खासदारांची कमिटी गठीत केली होती. सदर कमिटीने अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला आहे.
अंगणवाडी महिलांना किमान वेतन देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा, प्राव्हीेडंट फंड, पेंशन तसेच वाढत्या महागाईनुसार महागाई नुसार देण्यात यावा आदी शिफारशी केल्या आहेत. नवीन सरकारने अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांची गंभीरपणे दखल घेऊन महिला कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रतिभा देशपांडे यांनी मानले. विठाबाई भट, छाया कागदेलवार, नागोबाई मडावी, नागमणी दासरी, रेखा येगटीवार, बेबी त्रिनगरीवार, वंदना कातरकर, अनुसया झाडे, सुमंत तोकलवार यांनी सहकार्य केले.