रूग्णाला आणले खाटेवर

By Admin | Updated: October 3, 2016 02:09 IST2016-10-03T02:09:03+5:302016-10-03T02:09:03+5:30

भामरागड तालुक्याच्या लाहेरी भागात अद्यापही वाहतुकीच्या सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत.

The patient brought the coffin | रूग्णाला आणले खाटेवर

रूग्णाला आणले खाटेवर

लाहेरी : भामरागड तालुक्याच्या लाहेरी भागात अद्यापही वाहतुकीच्या सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत. शिवाय आरोग्याच्या सुविधाही येथे तोकड्या आहेत. त्यामुळे लाहेरीपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या छत्तीसगड राज्याच्या करेमर्का येथील दिनेश टुगे पुंगाटी या आजारी रूग्णाला खाटेवर लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. चार इसम आपल्या खांद्यावर सदर इसमाला खाटेवर झोपवून ४५ किमी अंतर कापून आरोग्य केंद्रात आणले. (वार्ताहर)

Web Title: The patient brought the coffin