लगाम येथे रस्त्याची दयनीय अवस्था : जीवावर बेतणाऱ्या खड्ड्यांमुळे नागरिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:53 IST2025-07-24T17:52:34+5:302025-07-24T17:53:19+5:30
नागरिकांची मागणी: तत्काळ रस्त्याचे डांबरीकरण करावे; गावातील मुख्य रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करावा

Pathetic condition of the road at Lagam: Citizens are scared due to life-threatening potholes
मुलचेरा : तालुक्यातील लगाम गावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच जड वाहनांच्या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत, आणि त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जर एखादा दुचाकीस्वार अशा खड्ड्यात पडला, तर त्याचा थेट जीवही जाऊ शकतो.
हल्लीच बोरी येथे अशाच प्रकारच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, ही घटना अजूनही गावकऱ्यांच्या लक्षात आहे. तरीही प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
स्थानिक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, वयोवृद्ध नागरिक हे रोज या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.