पॅसेंजरच्या तिकिटाचे दर झाले सुपर, मेल एक्सप्रेसच्या बरोबरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:42+5:30
कोरोनाच्या लाटेनंतर देशात सर्व रेल्वेगाड्यांचा प्रवास बंद करण्यात आला होता. आता त्या सर्व गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने सूचना दिल्या आहेत. रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅसेंजर रेल्वे सेवाही सुरळीत करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार २८ सप्टेंबरपासून गोंदिया ते बल्लारशाह एक स्पेशल मेमू ट्रेन (०८८०२) सुरू करण्यात आली.

पॅसेंजरच्या तिकिटाचे दर झाले सुपर, मेल एक्सप्रेसच्या बरोबरीत
लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : काेराेनाचे संकट काहीसे दूर झाल्यानंतर दीड वर्षाने रेल्वे गाड्या सुरू झाल्या. मात्र पॅसेंजर गाडीच्या तिकीट दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. विशेष म्हणजे पॅसेंजरच्या तिकिटाचे दरभाडे सुद्धा सुपर, मेल एक्सप्रेसच्या बरोबरीत आले आहे.
कोरोनाच्या लाटेनंतर देशात सर्व रेल्वेगाड्यांचा प्रवास बंद करण्यात आला होता. आता त्या सर्व गाड्या पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने सूचना दिल्या आहेत. रेल्वेच्या विविध झोनमध्ये पॅसेंजर रेल्वे सेवाही सुरळीत करण्यात येत आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या परिपत्रकानुसार २८ सप्टेंबरपासून गोंदिया ते बल्लारशाह एक स्पेशल मेमू ट्रेन (०८८०२) सुरू करण्यात आली. ही ट्रेन स्पेशल असल्याकारणाने या मेमू ट्रेनचे दरभाडे आधीच्या दरभाड्याच्या तुलनेत जास्त असल्याचे सांगितले जात आहे. परंतु यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष दिसून येत आहे.
- तर पुन्हा लागू होईल स्वस्त रेल्वेभाडे
भारतीय रेल्वेने ठरवून दिल्याप्रमाणे सद्यस्थितीत बहुतांश गाड्या स्पेशल ट्रेनच्या नावाने सुरू असल्यामुळे या सर्व ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकल तिकिटांच्या प्रवाशांकडून सुद्धा सुपर अथवा मेल एक्सप्रेसचा तिकीट दर आकारण्यात येत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले. या सर्व रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे कोणतेही विशेष नाव न लावता आपल्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील, त्यावेळेस पूर्वीप्रमाणे लोकल तिकिटाचे दर लागू होतील, अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली.