वेळेवर रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गरोदर माता घरीच प्रसुती झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवजात बालकाची प्रकृती बिघडून त्याचा उपचारादरम्यान अहेरी रूग्णालयात रविवारी मृत्यू झाला. ...
आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय ...
गडचिरोली जिल्ह्यातील जमिनीचे मृद नमुने तपासले असता, जमिनीत नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी तर पालाशचे भरपूर प्रमाणात आढळले आहे. त्यानुसार पिकांना नत्र व स्फुरदचे खत २५ टक्के अधिक प्रमाणात द्यावे. तर पालाश खताची मात्रा २५ टक्के कमी करण्याचा सल्ला डॉ. पंजाब ...
वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या शिवणी (कटंगटोला) कम्पार्टमेंट क्रमांक २६७, २८६ मधील अवैैध खनन करताना पकडलेल्या दोन ट्रॅक्टर मालकांवर वन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवणी येथील शेतकऱ्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली ...
सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ या वर्षात १८ कामांवर केवळ ४१ लाख ९१ हजार रूपये खर्च झाले आहेत. सुमारे २ कोटी ३१ लाखांचा निधी खर्च न झाल्याने परत करावा लागला आहे ...
विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी .... ...
देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे. ...
जिल्ह्यातील चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या चिचडोह प्रकल्पाचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या चाचणीसाठी पाणी अडविण्याचे काम सुरू झाले आहे. ...
‘अॅडॉप्ट ए हेरिटेज’ ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या कंपनीने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थानालाही दत्तक घेऊन विकास करावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. ...
पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. ...