कोरची तालुक्यातील शेतकºयांची दयनिय अवस्था असताना सुध्दा पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. योजनांच्या अनुदानातून बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी कोरची तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्यात, ...
अहेरी तालुक्यातील वेलगूर येथील मुख्य मार्ग व अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. वेलगुर येथील मुख्य रस्त्यावर समाजभवनासमोर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजप-सेना युती सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विद्यमान सरकार हे हुकूमशाही व हिटलरशाहीचे सरकार आहे. या हुकूमशाहीला आमचा विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला ...
आत्माच्या पुढाकाराने यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार एकरवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे ३१ गट तयार करण्यात आले आहेत. रासायनिक खतांमुळे कृषी क्षेत्रात क्रांती निर्माण झाली. ...
अहेरी तालुक्यातील झिमेलानजीक असलेल्या पाईपच्या कमी उंचीच्या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना खड्ड्याचा अडसर असतानाही धोकादायक वाहतूक सुरू आहे. परंतु या प्रकाराकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ...
तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला. ...
मुलगा लहाणाचा मोठा होत असताना पालकाच्या मुलाकडून अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मुलाला शाळेमध्ये पाठवितो. पालकाच्या अपेक्षेनुसार विद्यार्थ्याला शिक्षण देऊन त्याला घडविणे ही शिक्षकांची फार मोठी जबाबदारी आहे. ...
शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भामरागडसह तालुक्यात दमदार पाऊस झाला. जवळपास दोन तास मुक्काम ठोकत पावसाने भामरागड तालुक्याला झोडपून काढले. मुसळधार ...
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात जिल्हाभरातील ८०५ गावांमधील १९ हजार ९७३ मृद नमुने गोळा करण्यात आले. त्यांची तपासणी करून त्या अंतर्गत येणाऱ्या ६८ हजार ३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे. ...