गडचिरोली जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणाऱ्या वार्षिक सरासरी पावसाच्या अर्धा पाऊस २१ जुलैपर्यंत झाला आहे. आणखी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखत गडचिरोलीला मागास जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिल्हा आपला मानून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ...
नगर परिषदेच्या पथकाने गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावरील दुकानांमध्ये गुरूवारी धाड टाकून बंदी असलेले जवळपास ३०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५ हजार ५०० रूपयांची रक्कम वसूल केली. ...
आ.कृष्णा गजबे यांच्या मागणीची व पाठपुराव्याची दखल घेऊन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुरखेडा शहरातील विकास कामांसाठी पाच कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता या निधीतून कुरखेडा शहराच्या विविध वॉर्डात पायाभूत सुविधा होणार ...
एटापल्ली तालुक्याच्या तोडसा, पेठा येथे व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा बंद राहत असतो. या भागात वीज लपंडावाची समस्याही तीव्र झाली आहे. सदर समस्येच्या मुद्यावर तोडसा व पेठा येथील नागरिकांनी आक्रमक होत थेट एटापल्लीच्या वी ...
मोबाईल चार्ज करण्याच्या बहाण्याने घरात शिरून तिथे असलेल्या अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. नागेश समय्या मडे ( ...
गोंडवाना विद्यापीठाबद्दल कोण काय बोलते याला फारसे महत्व न देता विद्यापीठ आपले काम करीत आहे. या विद्यापीठाला नागपूर विद्यापीठाएवढे २२ विभाग मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मु ...
मागणीच्या तुलनेत महावितरणकडे कमी प्रमाणात मीटर उपलब्ध असल्याने मागील दोन महिन्यांपासून जवळपास दोन हजार वीज ग्राहकांचे अर्ज पडून आहेत. अनेकांनी डिमांड सुध्दा भरले आहे. मात्र वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. ...
वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली. ...
पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...