१६ जुलै रोजी चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पूर परिस्थितीमुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र त्यानंतर तब्बल २० दिवसांचा कालावधी उलटूनही पाऊस झाला नाही. मधात दोनदा अल्पसा पाऊस झाला. त्यानंतर पावसाने ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे नोकरभरतीतील कपात केलेले आरक्षण पूर्ववत करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शनिवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शेकडो ओबीसी बांधवांनी देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरका ...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात केवळ जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव रुग्णालय संलग्न आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत उपचार करायचा असल्यास जिल्हाभरातील रुग्णांना गडचिरोली गाठावे लागते. अशा स्थितीत ग्रामीण गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले ज ...
महिला, युवक, शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत चालले आहे. गावात किंवा वॉर्डात दारूबंदी, खर्राबंदी करायची असेल तर महिलांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यांवरून कपात करीत ते ६ टक्क्यांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव व बेरोजगार युवक, युवतींवर मोठा अन्याय होत आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार ओबीसी समाजबांधव तसेच आदिवासी व गोरगरीब जनतेच्या विविध प्रश्नांकडे राज्यशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी आरमोरी येथील तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. ...
शासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरात जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती केली. मात्र या रुग्णालयात बांधकामाच्या वेळी पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचा समावेश करण्यात आला नाही. ...
जिल्हाभरातील १२४ बचत गटांना दोन वर्षांपूर्वी धान रोवणी यंत्रांचे वितरण केले होते. दोन कोटी रूपये किमतीचे हे साहित्य देखभाल व दुरूस्तीअभावी बंद पडले असून पुन्हा पारंपरिक रितीनेच धानाची रोवणी करण्याकडे शेतकरीवर्ग वळला आहे. ...
अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते. ...