येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरूवारी चिंचगुंडी या गावातील लक्ष्मी बोरेवार या महिलेने मेंदूवर कवटी नसलेल्या बाळास जन्म दिला. मात्र २० तासानंतर शुक्रवारी त्या बाळाचा मृत्यू झाला. ...
आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्कार ...
देसाईगंज-कुरखेडा रस्त्यावर देसाईगंज शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर तुकूम वॉर्ड परिसरात वैनंगगा मोटर्स ते जकात नाका समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पाऊस येत असताना या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्डे दिसत नाही. ...
झिंगानूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या येडसिली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून दुचाकी तर सोडाच बैलबंडी किंवा पायदळ जाणेही कठीण झाले आहे. ...
स्क्रब टायफस आजाराची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये या आजाराचे औषध उपलब्ध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सदर औषध तत्काळ घ्यावे, असे आवाहन जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. व ...
एटापल्ली-जारावंडी मार्गावर असलेल्या झुरी नाल्याच्या दुरूस्तीवर मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ४० लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पाण्यात झुरी नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काम निकृष्ट झाले असल्याचे स्पष्ट होत असून याची चौकशी करावी, अशी ...
शाळेचा किरकोळ खर्च भागविण्यासाठी जिल्हाभरातील शाळांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुमारे १ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पटसंख्येच्या आधारावर १० हजार ते २० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण होणार आहे. हे तुटपुंजे अनुदान वर्षभर कसे पुर ...
विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. विद्यमान सरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केली. ...
सिझर प्रसूतीसाठी कुरखेडा येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागणार असल्याचे सांगितल्यानंतर वैतागलेल्या सिकलसेलग्रस्त एका गर्भवती आदिवासी महिलेने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात घरचा रस्ता धरला. ही माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली होती. ...