पोलीस विभागाच्या वतीने मेडपल्ली येथे झालेल्या जनजागरण मेळाव्यात नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. गावातील महिलांना कपडे, लहान मुलांना चप्पल वितरित करण्यात आले. ...
नक्षलविरोधी अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियन कार्यरत आहेत. त्यांच्याकडून नक्षली कारवाया रोखण्यासोबतच आता नागरी कृती कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमही राबवून गोरगरीब आदिवासींना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
डोक्यावर भाल्याने वार करून बहिणीची हत्या करणाऱ्या आरोपीस भावास गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी दिला. ...
मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धान पिकावर कडाकरपा, तुडतुडा, बेरड, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...
चामोर्शी जिल्ह्यातील नरेंद्रपूर गावातील नागरिकांना मोक्षधामात मृतदेहासोबत बैलगाडीतून पाण्याचा ड्रमही न्यावा लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. ...
मुलगाच व्हावा म्हणून काही जोडपी गरोदरपणीच सोनोग्राफीव्दारे गर्भाची तपासणी करतात. स्त्रिलिंगी गर्भ असेल तर निर्दयीपणे गर्भपात करुन त्या जिवाचा छळ करतात. यामुळेच समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी झाले आहे. ...
ग्रामपंचायतीने ज्या मजुरांना कामावर घेतले आहे, त्या मजुरांचे आधार कार्ड किंवा जॉबकार्ड असे कोणतेच पुरावे घेतले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने लावलेले मजूर नेमके तेच मजूर आहेत काय, हे स्पष्ट होत नाही, असे सहायक आयुक्त यांनी केलेल्या चौकशीदरम्यान उघडकीस ...
आलापल्ली व तलवाडा उपक्षेत्रात लावण्यात आलेला साग रोपवनाची नासाडी करणाऱ्या ११० मोकाट जनावरांना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना वन विभागाच्या निवासस्थानांमध्ये डांबून ठेवले होते. ...
देसाईगंज शहरातून चारचाकी वाहनाद्वारे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून २ लाख ७९ हजार रूपयांची दारू गुरूवारी सकाळी ११ वाजता जप्त केली. परंतु वाहतूक करणारे आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. ...