आरमोरी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात यावे, याबाबत अनेकदा चर्चा व मागणी करूनही शेतीला इटियाडोहाचे पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख हरीष मने यांच्या नेतृत्वात ...
गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. ...
गोंदिया जिल्ह्यातील ईटियाडोह धरणाचे पाणी धानपिकासाठी मागील तीन दिवसांपासून सोडण्यात आले आहे. मात्र कमी दाबामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. ...
१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने धानपीक संकटात आले आहे. मात्र अजूनपर्यंत ईटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही. पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अरसोडा, मुल्लुरचेक, मुल्लुर रिठ येथील नागरिकांनी केली आहे. ...
धानोरा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात अनेक समस्या असल्याने या समस्यांचा सामना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना करावा लागत आहे. सोयीसुविधांच्या अभावामुळे येथील बहुतांश रुग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीचे सुशोभीकरण करण्यासाठी ५४ लाख २० हजार ५९० रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या नोकरभरतीत केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना स्थान देऊन ओबीसींवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबरच्या परिपत्रकाची होळी केली. ...
मागील १५ दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. मंगळवारी पेट्रोलने उच्चांक गाठत नव्वदी पार केली आहे. पेट्रोल व डिझेल किमतीचे दर दिवशी उच्चांक गाठत असल्याने महागाईचा भडका उडाला आहे. ...
मागील दोन वर्षात नगर परिषदेला निधीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. नुकताच विविध योजनांतर्गत नगर परिषदेने दोन कोटी रूपयांच्या कामांची निविदा काढली आहे. सदर कामे सुरू होण्यास ...
गोठ्यात बांधलेला बोकड चोरणाऱ्या तिघा जणांना पकडून करपडा येथील नागरिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर घटना सोमवार रात्रीच्या सुमारास घडली. ...