राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे अतिक्रमित दुकाने हटविली जात आहेत. याच भरवशावर प्रपंच करणाऱ्या शेकडो अतिक्रमणधारक बेरोजगार होण्याचे संकट कोसळले आहे. ...
तालुक्यातील खरगी गावातील नागरिकांनी दारू विरोधात एल्गार पुकारत चक्क दारूची अंत्ययात्रा काढली. या दारूच्या तिरडीला गावच्या पोलीस पाटलांनी खांदा दिला. खरगीवासीयांच्या दारूबंदीच्या या अनोख्या उपक्रमाची तालुकाभरात चर्चा सुरू आहे. ...
आपल्या प्राप्तीपेक्षा अचानक उद्भवलेल्या आजारावर खर्च मोठ्या प्रमाणावर संभवतो. गरीब व्यक्तीला आजारावर उपचार करणे शक्य होत नाही. याची जाणीव ठेवून भारत सरकारने देशात प्रधानमंत्री महत्वाकांक्षी जन आरोग्य योजनेअंतर्गत वार्षीक पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक शाळेच्या क्रिडांगणावर मंगळवारपासून तीनदिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात गडचिरोली प्रकल्पातील ४३ आश्रमशाळेतील एकूण १ हजार ४६ खेळाडूंना क्रीडाकौशल् ...
तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. ...
दमट वातावरणामुळे वैरागड परिसरातील धानपिकावर खोडकिडा, तुडतुडा, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला असून विविध कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतरही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
गडचिरोली शहर ते कॉम्प्लेक्स परिसरापर्यंत चालविण्यात येणाऱ्या आॅटोमध्ये केवळ तीन प्रवाशी बसविण्याचे निर्देश पोलीस विभागाने दिले. या निर्णयाविरोधात आॅटो चालक मालक संघटनेच्या वतीने शुक्रवारी आॅटोची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. ...
गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली. ...
जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच कपाशीवर गुलाबी बोंडअळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. ...