पेरमिली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व वनपाल यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमाचे आयोजन आलापल्ली स्थित वनपरिक्षेत्र कार्यालयात शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मांसाहाराची पार्टी रंगली. ...
गोंडवाना विद्यापीठाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त २ आॅक्टोबर रोजी र्सचचे संचालक डॉ. अभय बंग यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ...
तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पोषण आहार पुरविण्यासोबतच त्यांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी केंद्रांवर आहे. बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत अंगणवाडी केंद्राच्या वतीने गर्भवती माता व मुला, मुलींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. ...
तालुक्यातील अरततोंडी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरमत टोला, देऊळगाव, अरततोंडी या तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येऊन अवैधरित्या सुरू असलेल्या दारूविक्री बंद करण्याचा निर्णय २७ सप्टेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत घेतला. ...
भारतीय लष्करासाठी जवानांची अमरावती येथे पदभरती होत असून त्यात विदर्भातील बेरोजगार युवकांना देशसेवा करण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्यातही आदिवासी क्षेत्रातील युवकांना उंची आणि वजनातही सूट दिली जात आहे. ...
जीवनशैलीत होत असलेल्या बदलामुळे दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या नोंदीनुसार मागील वर्षी जिल्हाभरात हृदयरोगाच्या रूग्णांची संख्या केवळ १७६ एवढी होती. ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे १ हजार २०० घरकूल मंजूर करण्यात आले आहे. घरकूल मिळेल, या आशेने नागरिकांनी घर बांधले नाही. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही घरकुलासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न आणखी दूर जात आहे ...
जिल्हा केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच गडचिरोली जनरल मर्चंट असोसिएशन यांनी शुक्रवारी गडचिरोली बंदचे आवाहन केले होते. या बंदला गडचिरोली शहरातील सर्वच दुकानदारांनी प्रतिसाद दर्शविला. ...
वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत तालुक्यातील रामपूर चेक येथील वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकºयांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. परंतु नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही सातबारा उपलब्ध करून देण्यात आला नाही. ...
गडचिरोली पोलीस दलामार्फत आदिवासी मुलांमुलीसाठी महाराष्ट्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ८१ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनासाठी गडचिरोली येथून रवाना झाले आहेत. यामध्ये नक्षल पीडित व नक्षल्यांचे नातेवाईक यांचा सुध्दा समावेश आहे. ...