चामोर्शी तालुक्यातील तळोधी मो. व परिसरातील धान पीक पावसाअभावी करपले आहे. शेवटच्या टप्प्यात असलेले धान पीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. परंतु पाण्याचे स्त्रोत आटण्याच्या स्थितीत असल्याने धान पीक पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ...
तालुक्यातील कुकडी परिसरातील मोहफुलाच्या हातभट्टीवर आरमोरीचे पोलीस निरीक्षक अजित राठोड यांनी बुधवारी धाड टाकून मोहफुलाची दारू, सडवा व मोहफुले असा एकूण ३ लाख ४६ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
स्थानिक इंदिरा गांधी चौकालगतच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयासह लगतच्या चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातून गर्भवती महिला व बाल रुग्ण मोठ्या संख्येने रेफर होत असल्याने सदर रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. ...
बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी, तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात सोमवारी येथील तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूरच्या वतीने नागपूर येथे आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत गडचिरोली येथील प्लॅटिनम हायस्कूलचे दोन व कारमेल हायस्कूलचा एक अशा तीन विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले. ...
आरोग्य व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचरांना केवळ १ हजार २०० रूपये मानधन दिले जाते. मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ केली नाही. ...
उष्ण व दमट वातावरण धानपिकावरील तुडतुडा किडीसाठी पोषक आहे. सद्य:स्थितीत तुडतुडा किडीचा प्रभाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या आत दिसत असला तरी हवामान बघता या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. ...
एटापल्ली-आलापल्ली मार्गावरील एलचिल ते तोंदेल या पाच किमी मार्गावर डोंगर असून नागमोडी वळण आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ७ आॅक्टोबर रोजी लोहदगड घेऊन जाणारा ट्रक उलटला. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी एटापल्ली तालुक्याच्या अतिदुर्गम तोडसा भागात शनिवारी दौरा करून तेथील वनराई बंधारा कामाची पाहणी केली. तसेच आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्याच्या समस्याही जाणून घेतले. ...