आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत घोट परिसरात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने सुरुवातील या केंद्रांवर अल्प प्रमाणात बारदान्याचा पुरवठा करण्यात आला. ...
वारंवार निवेदने देऊनही शासनाने पंचायत समिती सदस्यांना १४ व्या वित्त आयोगाचा विकास निधी तसेच सभापती व उपसभापतींना वाहन उपलब्ध करुन न दिल्याने शुक्रवारी गडचिरोली पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार घालून शासनाप्रती रोष व्यक्त केला. ...
जिल्हाभरातील ९१ हजार कुटुंब सध्या कच्च्या घरात राहात असल्याचे तथ्य प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या ताज्या पाहणीत आढळून आले आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने घरकुल उपलब्ध करून देण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेपुढे येऊन ठेपले आहे. ...
तालुक्यातील बेलगाव येथे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी गावाशेजारच्या नाल्यात पुरलेल्या स्थितीत आढळून आला. सुरेश सोनसाय धुर्वे (२५) रा. बोगाटोला पो. कोटरा ता. कोरची असे मृतकाचे नाव आहे. ...
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाषेची समस्या गंभीर असल्याने भामरागड तालुक्यातील काही शिक्षकांनी पहिल्या व दुसऱ्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे ‘माडिया’ भाषेत भाषांतर केले आहे. ...
तालुक्यातील देलनवाडी येथे काही दिवसांपूर्वी दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटना तयार झाली. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असला तरी अनेक महिलाच दारूची विक्री करीत होत्या. अशा सहा दारूविक्रेत्या महिलांच्या घरी धाड टाकून गाव संघटनेने दारू जप्त केली ...
कुणबी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात २० हजार पेक्षा अधिक कुणबी समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या एकतेचा प्रत्यय आला. ...
बहुप्रतिक्षीत आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. २७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २८ ला मतमोजणी होणार आाहे. ...
खेळ आणि आदिवासींचे अतूट नाते आहे. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आदिवासी खेळाडूंची नावे चमकत आहेत. आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. पण शिक्षणासोबत आरोग्याकडे आणि खेळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठीच या स्पर्धा घेतल्या जात ...
जांभुळखेडा लघुसिंचन प्रकल्प मागील ३६ वर्षांपासून रखडले होते. या सिंचन प्रकल्पासाठी रोहयोतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळून लवकरच प्रकल्प सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...