अहेरी वन परिक्षेत्रातील प्राणहिता व दिना नदीच्या पात्रात सागाच्या लाकडांपासून नाव तयार करण्याच्या ठिकाणावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकून सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड व अन्य साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. ...
रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने बांधकामे ठप्प पडली होती. कंत्राटदार, मजूर व सामान्य नागरिक रेती घाटांचे लिलाव होण्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर रेती घाटांच्या लिलावाची जाहिरात काढण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. ...
एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ७६ टक्के क्षेत्र जंगलाने व्यापलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वन वणवे लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या घटकांमार्फत लागणाऱ्या या आगींना नियंत्रित करण्यासाठी वनविभागाच्या पाचही विभागांकडून नियोजन ...
अनुकंपाधारकांना वनविभागाने नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अनुकंपाधारकांनी गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर १ मार्चपासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. मागण्यांचे निवेदन मुख्य वनसंरक्षक यांना देण्यात आले आहे. ...
बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेंतर्गत मुलीचे आधार कार्ड व बँक पासबूकची झेरॉक्स तसेच एक साधा अर्ज दिल्ली येथे पाठविल्यानंतर संबंधित खात्यावर दोन लाख रुपये जमा केले जातात, अशी अफवा गडचिरोली शहरात पसरली होती. ...
एटापल्लीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या गेदा गावातील युवकांनी भरमार बंदुकीने चितळाची शिकार केली. याप्रकरणी वनविभागाने तीन आरोपींना अटक केली. अहेरी न्यायालयाने शुक्रवारी तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविले. ...
गडचिरोली नगर परिषदेने अर्थिक वर्ष संपण्याची चाहुल लागताच कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून कर थकित आहे अशा ३०० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्रसर्वेक्षण करावे, ज्या गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा देसाई ...
राज्य व देशभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहेत. रोजगार प्राप्त करण्यासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले. ...