यावर्षीचा पाऊस असमतोल पडत आहे. त्यामुळे धान पिकाच्या रोवण्या लांबणीवर पडणार आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी या कालावधीत धानाच्या रोवण्यांना सुरूवात झाली होती. यावर्षी मात्र काही शेतकऱ्यांचे अजुनही धानाचे पऱ्हे टाकून झाले नाही. ...
राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये देसाईगंज येथील न्यायालयात राष्ट्रीय शनिवारी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच प्रीलिटीगेशनचे मामले ठेवण्यात आले होते. ...
कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून देसाईगंज शहर व परिसरातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांनी गंडविण्याच्या प्रकणातील गूढ अजूनही उकललेले नाही. प्रकरणातील बडे मासे अजूनही मोकळे फिरत असल्यामुळे पाणी कुठे मुरतेय का? कारवाईसंदर्भात राजकीय दबाव ...
जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. मात्र प्राप्त झालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्याकडे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री तथा जिल्ह्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ...
नहरावरील पुलाच्या खांबाला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मागे बसलेला एक व्यक्ती गंभीर जखमी असून मुलगा सुखरूप आहे. सदर घटना कुरूळ जवळ सायंकाळी ६ वाजता घडली. ...
भामरागड तालुका स्थळापासून १६ किमी अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील गरोदर महिलेला प्रसूतीसाठी रूग्णालयात भरती करायचे होते. मात्र गावादरम्यान असलेल्या नाल्यात पाणी असल्याने रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. ...
चामोर्शी तालुक्यातील भाडभिडी ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या जगमपूर येथील नाल्यांचा मागील अनेक वर्षांपासून उपसा केला नाही. त्यामुळे पावसाचे पाणी विहिरीच्या सभोवताल जमा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्यात येते. हयात नसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला कपातीचा परतावा व अन्य प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने ११ जुलै ...
१ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत. ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले. ...