मृत शिक्षकांच्या रक्कम कपातीचा परतावा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:23 AM2019-07-13T00:23:43+5:302019-07-13T00:24:49+5:30

अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्यात येते. हयात नसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला कपातीचा परतावा व अन्य प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने ११ जुलै रोजी धानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Return the amount of deceased teachers' deduction | मृत शिक्षकांच्या रक्कम कपातीचा परतावा द्या

मृत शिक्षकांच्या रक्कम कपातीचा परतावा द्या

googlenewsNext
ठळक मुद्देगटशिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा व निवेदन : महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : अंशदायी पेन्शन योजना लागू असलेल्या शिक्षकांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्यात येते. हयात नसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला कपातीचा परतावा व अन्य प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने ११ जुलै रोजी धानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाच्या ३६ महिन्यांच्या थकबाकीचा पहिला हप्ता जुलै महिन्यात द्यावा. १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त शिक्षकांच्या डीसीपीएस योजनेअंतर्गत झालेल्या कपातीच्या हिशोबाचे वर्षानिहाय विवरणपत्र देण्यात यावे. विवरणपत्र देण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा निवेदन, धरणे आंदोलन, साखळी उपोषण करण्यात आले आहे. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीमधील काही लिपीकवर्गीय कर्मचारी शिक्षकांना एकेरी शब्दात बोलतात. संबंधित लिपिकांवर प्रशासकीय कारवाई करावी, सर्व शिक्षकांना जुलै २०१९ चे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार जुलै महिन्याची वेतनवाढ लावून द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी आखाडे यांच्यासोबत चर्चा केली. आपल्यास्तरावरील मागण्या पूर्ण केल्या जातील, वरिष्ठ स्तरावरील मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. शिष्टमंडळात मयत शिक्षकाच्या कुटुंबातील मीना ऋषी उंदीरवाडे, स्नेहल ऋषी उंदीरवाडे, जुनी पेंशन हक्क संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष अंकुश मैलारे, जिल्हा सरचिटणीस बापू मुनघाटे, जिल्हा कोषाध्यक्ष विजय मोडपल्लीवार, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश आखाडे, राजू सोनटक्के, धानोरा तालुका अध्यक्ष दीपक सुरपाम, सचिव मंगेश दडमल, माजीद शेख, यशवंत कोराम, गणेश मोहुर्ले, जगदीश बावणे, संजय निकोसे, अमित टेंभूर्णे, गोरखनाथ तांदळे, रमेश कोवासे, रत्नमाला सयाम, शरद जगताप, सतीश कोल्हे, गणेश हलामी, राहुल पेंदोर, सुखदेव कुमोटी, लवकेश कोरटिया, बाबुराव आतला, रामगुलाल गवर्णा, यशवंत उईके, कल्पना कोडाप, मनोज धारणे, ठुमेश्वर घरत, युराज शिंदे, बळीराम देवकते हजर होते.

Web Title: Return the amount of deceased teachers' deduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.