सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्या, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते तत्काळ लागू करावे, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करून राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, लिपीक व लेखा लिपीकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान पदनाम, समान काम, समान ...
आरमोरी येथील प्रभाग क्रमांक ५ मधील दोन ते तीन पिढ्यांपासून जुने असलेले उंच घर शनिवारी अतिवृष्टीमुळे पडले. या घरांमुळे शेजारील घराचे मोठे नुकसान झाले. येथे कुठलीही जीवितहानी होऊ नये, तसेच दुसऱ्या घराचे नुकसान होऊ नये म्हणून रविवारी नगर परिषदेने अर्धवट ...
ज्या नागरिकांची घरे कोसळली, त्यांच्या कुटुंबांना ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसचिवालयात आश्रय देऊन या कुटुंबांच्या जेवनाची व्यवस्था जि.प. सदस्य संपत आळे यांनी केली. ...
यावर्षी सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. पुरामुळे दोन ते तीन वेळा रोवणी झालेले धानपीक वाहून गेले आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला होता. अशातच पुन्हा चार दिवसांपूर्वी पूर आला. याही पुरात होत्याचे नव्हते झाले. कापूस, सोयाबिन ...
नदीच्या पुलावरून जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. याच पाण्यातून त्यांनी दुचाकी टाकली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊन एका झाडाला अडकली. दोघेही वाहून जात असताना नाल्यातील झाडाच्या फांदीला अडकले. या फांदीच्या आधाराने दोघेही झाडावर चढले ...
इंद्रावती नदीला पूर आल्याने पर्लकोटा नदीला दाब येऊन पर्लकोटाचे पाणी भामरागडात तीन दिवसांपूर्वी शिरले. इंद्रावती अजुनही धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने भामरागड येथील पूर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जवळपास ५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलव ...
काही घरांच्या भिंती कोसळल्याने अंशत: नुकसान झाले आहे. तर काही घरे पूर्णपणे कोसळली आहेत. छत कोसळल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दैनंदन वापराच्या वस्तू व जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. ...
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा हे शहर महाराष्ट्र व गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. सिरोंचापासून चंद्रपूर २२०, गडचिरोली २१०, नागपूर ३०५ किमी अंतर आहे. एवढ्या दूर अंतरावर जाऊन राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत उपचार घेणे कठीण होते. दुर्गम भा ...
दुसऱ्या प्रकरणात गडचिरोली तालुक्यातील बामणी येथील अमोल ज्ञानेश्वर उंदीरवाडे याने १६ जून २०१७ रोजी फिर्यादीला अश्लिल भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच ...