मागील वर्षी सदर रेती घाट मूल येथील रेती कंत्राटदार हसन वाढई यांना मिळाला होता. नदी पात्रातून रेती काढण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. वाढई यांनी काही रेती नदीजवळ साठा करून ठेवली होती. साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करण्यासाठी त्यांनी टीपी ...
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात आविका संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांचा माल आविका संस्थेच्या केंद्रांवर विक्रीसाठी यावा, तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने शासनाच्या व ...
२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कोरची येथील सिताबाई हिडामी यांच्या शेतातील धानाच्या पुंजन्याला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण पुंजने जळून खाक झाले. घटनास्थळी तहसीलदारांनी भेट देऊन हिडामी यांना मदत देण्याचे आश्वासन दिले. हिडामी यांचे जवळपास दोन ...
याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिदास राऊत म्हणाले, भारतीय संविधान हे जगातील सर्वाेत्कृष्ट ग्रंथ आहे. सर्वसामान्यांना संविधानाप्रति जागरूक करणे आवश्यक आहे. संविधानाची उद्देशिका ही मध्यवर्ती संकल्पना असून ही प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नाही तर आपल्या जग ...
मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मा ...
विद्यापीठाचे कुलपती या नात्याने राज्यपालांनी सदर महोत्सव घेण्याची संधी गोंडवाना विद्यापीठाला दिली आहे. २ ते ५ डिसेंबरपर्यंत विविध स्पर्धांचे सादरीकरण चालणार असून दि.६ ला बक्षीस वितरण व समारोप होणार आहे. संपूर्ण राज्यातील २० विद्यापीठांमधील सळसळती तरु ...
या तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोवणीचे काम लांबणीवर पडले. परिणामी धानाची कापणी व बांधणीचे कामही पुढे सरकले. आता धानोरा तालुक्यात हलके, मध्यम व जड या तीनही प्रतीच्या धानाची ल ...
सदर अपघातातील जखमीचे नाव कळू शकले नाही. या टिप्परमधील दोन व्यक्ती अपघात होताच पळून गेले. जखमी चालकाला आरमोरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. वैरागड परिसरातून खरेदी केलेले चार जनावरांना एमएच-४९-एटी-५०१७ क्रमांकाचा टिप्पर वैरागड-रामाळा मार्गावरून भरध ...