धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांसाठी झाली साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:00:26+5:30
दवंडी येथे आविका संस्थेचे सभापती सिमूजी ताडाम यांच्या हस्ते धान खरेदी केेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती सदाशिव सहारे, संचालक नरेश टेंभूर्णे, दिनेश सेलाेकर, तुकाराम दुर्गे, भाऊराव भाेयर, आत्माराम काळे, व्ही.आर.मडकाम, व्यवस्थापक व्ही.व्ही.वऱ्हाडे, वाय.के.गावतुरे, श्यामराव आतला, स्वप्नील ताडाम यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. भाकराेंडी ते पिसेवडधा परिसरातील शेतकऱ्यांची धान विकण्याची साेय या केंद्रामुळे झाली आहे.

धान खरेदी केंद्रांमुळे शेतकऱ्यांसाठी झाली साेय
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आदिवासी विकास महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत अहेरी व आलापल्ली येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम उपस्थित होते. यावेळी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी, शेतकऱ्यांनी आपले धान बाहेर विक्री न करता थेट शासकीय गोदामात आणून धानाची विक्री करावी. कारण धानाला योग्य भाव व दरासह बोनसही मिळते. याचा लाभ शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घ्यावे, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी केले.
धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आविका संस्थेचे अध्यक्ष क्रिष्किंद्ररावबाबा आत्राम, उपाध्यक्ष बाबुराव जक्कोजवार, विपणन सहाय्यक दामोदर जुगनाके, ग्रेडर अनंतकुमार आलाम, माजी सरपंच गंगाराम कोडापे, सचिव राजेंद्र गौरकार तसेच आलापल्ली येथे भीमय्या साइनवार, अचूबाई सडमेक, ईश्वर वेलादी, माजी उपसरपंच मलय्या तोटावार, सचिव कोमले, लक्ष्मण येरावार, बाबुराव तोरेम, पुनशे, तलांडे, बशीर शेख, सुरेश कोरेत, बाबुराव जुनघरे, आदित्य जक्कोजवार, शुभम चिंतावार यांच्यासह दाेन्ही ठिकाणाचे शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित होते.
काेरेगाव व दवंडी येथे धान खरेदीचा शुभारंभ
काेरेगाव/चाेप/मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र स्टेट काे-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने काेरेगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आरमाेरी तालुक्याच्या दवंडी (खडकी) येथे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी साेसायटीच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. काेरेगाव येथील उद्घाटनप्रसंगी देसाईगंज सहकारी खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष अण्णाजी तुपट, परसराम टिकले, दिनेश कुर्जेकर, तुकाराम तितीरमारे, सचिव पुंडलिक तलमलेे, आबाजी राऊत, ज्ञानेश्वर बुल्ले, पुरूषाेत्तम गायकवाड, अरूण गायकवाड, नानाजी मुंडले, कृष्णा पुस्ताेडे व शेतकरी उपस्थित हाेते. या धान केंद्रावर १ हजार ७८० शेतकऱ्यांनी धानविक्रीसाठी टाेकण घेतले असून आधारभूत हमीभाव ‘अ’ ग्रेटचे धान १ हजार ८८८ रुपये व ‘ब’ ग्रेडचे धान १ हजार ८६८ रुपयांच्या हमीभावाने खरेदी केले जाणार आहे. महाआघाडी सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बाेनस जाहीर केला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. दवंडी येथे आविका संस्थेचे सभापती सिमूजी ताडाम यांच्या हस्ते धान खरेदी केेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपसभापती सदाशिव सहारे, संचालक नरेश टेंभूर्णे, दिनेश सेलाेकर, तुकाराम दुर्गे, भाऊराव भाेयर, आत्माराम काळे, व्ही.आर.मडकाम, व्यवस्थापक व्ही.व्ही.वऱ्हाडे, वाय.के.गावतुरे, श्यामराव आतला, स्वप्नील ताडाम यांच्यासह शेतकरी उपस्थित हाेते. भाकराेंडी ते पिसेवडधा परिसरातील शेतकऱ्यांची धान विकण्याची साेय या केंद्रामुळे झाली आहे. येथे टाेकन पद्धतीचा अवलंब केला जात आहे.
पिंपळगावात धान खरेदी केंद्र सुरू
देसाईगंज : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पिंपळगाव येथे ०२ डिसेंबर रोजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती कृष्णा भाेयर, उपसभापती आर.एस.कुमरे, सदस्य के.टी.राऊत, बी.एस.भाेयर, वाय.एम.घरत, एम.एम.प्रधान, एस.गायकवाड यांच्यासह आविका संस्थेचे कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित हाेते. आ.कृष्णा गजबे यांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शासन व प्रशासनाकडे केली हाेती.