पिंपळगावात झाली यंत्राने धान रोवणी

By Admin | Updated: July 17, 2014 00:07 IST2014-07-17T00:07:11+5:302014-07-17T00:07:11+5:30

देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Paddy plantation in Pimpalgaon | पिंपळगावात झाली यंत्राने धान रोवणी

पिंपळगावात झाली यंत्राने धान रोवणी

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या पिंपळगाव (हलबी) येथे यंत्राच्या सहाय्याने भात रोवणीचा कार्यक्रम मंगळवारी पावसाच्या सरींसोबतच गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार, पं. स. चे सभापती परसराम टिकले तसेच पिंपळगाव येथील आदर्श महिला विकास बचत गटाच्या अध्यक्ष व सरपंच सुहांगणा प्रधान, उपविभागीय कृषी अधिकारी तांबे, उपसरपंच मोहनलाल शेंडे, जिल्हा कृषी अधिकारी एस. टी. पठाण, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव भोयर, ग्रा. पं. सदस्य ज्योती घुमडे, मंगला गेडाम, मंडळ अधिकारी सहारे, कृषी अधिकारी धोटे, आदी उपस्थित होते. याप्रसंगी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती पद्धतीपासून दूर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करावा, असे आवाहन केले. जिल्ह्यात ३७ गटांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन रोवणीचे कार्यक्रम राबविले जात आहे, असे सांगितले. सभापती परसराम टिकले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तांबे यांनी तर संचालन तुषार पवार, आभार हिरालाल प्रधान यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Paddy plantation in Pimpalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.