सहा हजार हेक्टरवर धान राेवणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 05:00 IST2021-07-17T05:00:00+5:302021-07-17T05:00:41+5:30

धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशानीच राेवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच केवळ सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या राेवणीची कामे आटाेपली आहेत.

Paddy cultivation completed on six thousand hectares | सहा हजार हेक्टरवर धान राेवणी पूर्ण

सहा हजार हेक्टरवर धान राेवणी पूर्ण

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा : जिल्हाभरात १ लाख ६८ हजार क्षेत्रावर लागवड होणार

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धान राेवणीची कामे आटाेपली आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी काेसळत असल्याने धान राेवणी सुरू असली तरी अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम येत आहे. 
यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ६८ हजार ४२० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. 
धान राेवणी करण्यासाठी ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पऱ्हे टाकण्यात आले आहे. राेवणीच्या कामाला सुरुवात करण्यासाठी माेठ्या पावसाची गरज भासते. मात्र अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात तसेच ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे अशानीच राेवणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच केवळ सहा हजार हेक्टर क्षेत्रावर धानाच्या राेवणीची कामे आटाेपली आहेत. आता काही दिवसापूर्वी पाऊस झाल्याने राेवणीचे काम वेगात आले आहे. परिणामी मजूर मिळत नाही.

१५७९१ हेक्टरवर आवत्या 

धान राेवणीचा खर्च वाचविण्यासाठी काही शेतकरी आवत्या पद्धतीने धानाची राेवणी करतात. यावर्षी सुमारे १५ हजार ७९१ हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली आहे. आवत्या बराेबरच काही शेतकऱ्यांनी यावर्षीपासून धानाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. गडचिराेली तालुक्यात ३ हजार २६९, कुरखेडा ४७६, आरमाेरी ४ हजार १०४, चामाेर्शी ५५३, धानाेरा ३ हजार ८९, काेरची १ हजार, देसाईगंज १ हजार २१७, मुलचेरा १५९, भामरागड ३९८ हेक्टर क्षेत्रावर आवत्याची लागवड करण्यात आली आहे. 

सिराेंचा तालुक्यात पऱ्हे भरण्यास सुरुवात 

सिराेंचा तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. आता शेतकरी पऱ्हे टाकत आहेत. त्यामुळे धान राेवणीच्या कामाला सुरुवात हाेण्यास पुन्हा १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या तालुक्यात कापसाचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी कापसाच्या लागवडीत व्यस्त असल्याचे दिसून येतात. कापसाची लागवड झाल्यानंतर शेतकरी धान पिकाकडे वळतात. 

तळोधी, कुनघाडा परिसरातील  रोवणीला सुरुवात
तळोधी (मो) : परिसरातील कुनघाडा रै, तळोधी (मो.), पाविमुरंडा परिसरातील रोवणीच्या कामांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत पावसाने सातत्य राखल्याने पावसाच्या पाण्यावरच पऱ्हे व रोवणीची कामे केली जात आहेत. यावर्षी पिकांमध्ये मोहरा धानाच्या वाणाला पहिली पसंती असल्याचे दिसते. त्याचबरोबर ५५५, श्रीराम आणि अन्य वाणांच्या बीजाचे रोपण केले जात आहे. 
पुढेही पावसाने योग्य साथ दिली तर यावर्षी पूर्ण पीक येण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटात डिझेल, पेट्रोलचे भाव अधिक झाल्याने शेतीकामासाठी ट्रॅक्टरचे भाडे वाढले असून, शेतकऱ्यांच्या खिशाला अधिकचा भार पडत आहे. पीक निघाल्यावर धानाचे भाव योग्य राहिल्यास शेतकऱ्यांचा हा अधिकचा खर्च भरून निघू शकतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहे.

 

Web Title: Paddy cultivation completed on six thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती