चामोर्शीत काेविड सेंटरसह ऑक्सिजन प्लांट उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST2021-05-05T05:00:11+5:302021-05-05T05:00:11+5:30

चामाेर्शी : काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चामाेर्शीचे संचालक मंडळ पुढे सरसावले असून ५० खाटांच्या काेविड ...

An oxygen plant will be set up with a cavitation center at Chamorshi | चामोर्शीत काेविड सेंटरसह ऑक्सिजन प्लांट उभारणार

चामोर्शीत काेविड सेंटरसह ऑक्सिजन प्लांट उभारणार

चामाेर्शी : काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती चामाेर्शीचे संचालक मंडळ पुढे सरसावले असून ५० खाटांच्या काेविड सेंटर तथा शासनाने मान्यता दिल्यास बाजार समिती स्वनिधीतून चामाेर्शी येथे ऑक्सिन प्लांट उभारणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी दिली.

गाेरगरीब शेतकरी व इतर सर्व नागरिकांना साेयी-सुविधा उभारून काेराेनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत चामाेर्शी येथे ५० खाटांचा काेविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्ह्यासह राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शासनाने मान्यता प्रदान केल्यास बाजार समिती स्वनिधीतून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत परवानगीसाठी राज्याच्या सरकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे गण्यारपवार यांनी सांगितले.

यावेळी सभेला बाजार समितीचे उपसभापती प्रेमानंद मलिक, सदस्य अरुण बंडावार, सुधाकर निखाडे, गाेसाई सातपुते, शंकर वंगावार, गणपती भंडारे, निकेश गद्देवार, रामचंद्र ब्राह्मणकर, सतीश राॅय, बाजीराव गावडे, अनिल नैताम, काैशल्या पाेरटे, बयणाबाई मडावी, समितीचे संचालक अमाेल गण्यारपवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित हाेते.

Web Title: An oxygen plant will be set up with a cavitation center at Chamorshi