शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

४५० वर शेततळे पूर्ण

By admin | Updated: April 3, 2017 02:16 IST

राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत

१६७ लाख रूपयांचा खर्च : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून सिंचन गडचिरोली : राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५० वर शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून शेकडो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. शेततळ्याच्या कामावर जिल्हाभरात आतापर्यंत एकूण १६७.१७ लाखांचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बाराही तालुके मिळून एकूण १ हजार ५०० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने कृषी विभागाला दिले होते. कृषी विभागाने आवाहन केल्यानंतर बाराही तालुक्यातून एकूण ४ हजार १२९ शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज सादर केले. सेवा शुल्क भरलेल्या एकूण ३ हजार ५४७ शेतकऱ्यांपैकी शासन निर्णयानुसार ३ हजार ३५१ शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या लाभासाठी कृषी विभागाने पात्र ठरविले. कृषी विभागाने १ हजार ४१२ शेततळ्याच्या कामास मंजुरी प्रदान केली. यापैकी १ हजार ३४० शेततळ्यांच्या कामास कार्यारंभ आदेश कृषी विभागातर्फे देण्यात आले. यापैकी आतापर्यंत ४११ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सद्य:स्थितीत १३३ शेततळ्याचे काम सुरू आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती गावागावात पोहोचविण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून शेतकऱ्यांकडून शेततळ्याच्या लाभासाठी अर्ज सादर करण्यात आले. या शेततळ्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. याशिवाय जलयुक्त शिवार अभियानातूनही जलसंधारणाची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. शेततळे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. आता शेततळ्याच्या कामाने जिल्हाभरात वेग घेतला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) त्रुट्यांमुळे ४३ अर्ज अपात्र शेततळ्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांनाी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केलेत. मात्र या अर्जासोबत सातबारा, शेत जमिनीचा नकाशा व इतर महत्त्वाचे दस्तावेज संबंधित शेतकऱ्याांनी सादर केले नाही. शेतकऱ्यांनी सेवा शुल्क भरूनही कृषी विभागाच्या वतीने ४३ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यातील १५, अहेरी तालुक्यातील १६ व भामरागड तालुक्यातील १२ अर्जांचा समावेश आहे. त्रुट्या पूर्ण करून पुढील वर्षात सुधारीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेततळ्यांच्या कामात गडचिरोली तालुका अव्वल जिल्ह्यात गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक ९६ शेततळ्याचे काम संबंधित शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. त्या खालोखाल अहेरी तालुक्यात ८१, तर एटापल्ली तालुक्यात ७३, धानोरा तालुक्यात ३७ शेततळ्याचे काम पूर्ण झाले आहे. इतर तालुके माघारले असून या तालुक्यांमध्ये ५ ते २० पर्यंत अशी पूर्ण झालेल्या शेततळ्यांची संख्या आहे.