शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संतापजनक! कबुतर चोरल्याच्या संशयातून चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण

By संजय तिपाले | Updated: August 6, 2024 17:11 IST

देसाईगंज तालुक्यातील घटना: व्हिडिओ व्हायरल, अल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल

गडचिरोली : कबुतर चोरल्याचा आरोप करून चार चिमुकल्यांना अमानुषपणे  मारहाण केल्याची संतापजनक घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे ६ ऑगस्टरोजी उघडकीस आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी एकाअल्पवयीन युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे राम मंदिर परिसरात चार चिमुकल्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती.  या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर  सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एक अल्पवयीन आरोपी चार चिमुकल्यांना बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. आरोपीच्या वडिलांची देसाईगंज येथे रक्त तपासणी प्रयोगशाळा असून तो अल्पवयीन आहे. या अल्पवयीन आरोपीने पीडित चिमुकल्यांवर कबुतर चोरल्याचा आरोप केला. एवढ्यावरच न थांबता त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. लाकडी दांड्याने मारताना व जवळ असलेल्या सळाखिंवर त्या चिमुकल्यांना उचलून फेकून दिले. चित्रफितीत एक प्रौढ व्यक्ती सुद्धा चिमुकल्यांचा बचाव करताना दिसत आहे, परंतु आरोपी त्याचे काहीही न ऐकता चिमुकल्यांना बेदम करीत असल्याचे दिसून येत आहे. घटनेच्या तब्बल पंधरा दिवसानंतर चित्रफित सार्वत्रिक होताच देसाईगंजमध्ये संतापाची लाट उसळली. ५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पीडित बालकांचे आई-वडील, नातेवाईक व नागरिक आरोपीच्या कस्तुरबा वार्डातील घरापुढे गोळा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना ही बाब समजताच त्यांनी जमावाला शांत करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. 

गुन्हा घडला तेंव्हा आरोपी अल्पवयीन 

या घटनेतील आरोपीने ४ ऑगस्ट रोजी वयाचे अठरा वर्षे पूर्ण केले आहे. मात्र, ही मारहाण झाली तेव्हा तो अल्पवयीन होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २० जुलै रोजीची आहे. त्यामुळे आरोपीची अल्पवयीन म्हणून नोंद करण्यात आली. 

"ही घटना २० जुलै रोजीची असून व्हिडिओ व्हायरल  झाल्यानंतर प्रकरण उजेडात आले. या घटनेबाबत पीडित मुलांनी देखील त्याबद्दल कुठे वाच्यता केलेली नव्हती. गुन्ह्याच्या वेळेस आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याची विधीसंघर्षग्रस्त म्हणूनच नोंद करण्यात आलेली आहे."- अजय जगताप, पोलीस निरीक्षक, देसाईगंज  

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी