सामुदायिक सर्वेक्षणातून हिवताप रुग्णांची शाेधमाेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST2021-03-13T05:06:04+5:302021-03-13T05:06:04+5:30

काेरची तालुक्यात मागील वर्षी २८२ हिवताप रुग्ण आढळून आले हाेते. हिवतापाचा प्रसार राेखणे, तसेच हिवताप दूषित रुग्णांचा शाेध घेऊन ...

Outbreaks appear to be exacerbated during community surveys | सामुदायिक सर्वेक्षणातून हिवताप रुग्णांची शाेधमाेहीम

सामुदायिक सर्वेक्षणातून हिवताप रुग्णांची शाेधमाेहीम

काेरची तालुक्यात मागील वर्षी २८२ हिवताप रुग्ण आढळून आले हाेते. हिवतापाचा प्रसार राेखणे, तसेच हिवताप दूषित रुग्णांचा शाेध घेऊन समूळ उच्चाटन करणे यासाठी हिवताप जंतूभार शोधणे तसेच लक्षणे विरहित रुग्णांचा शोध घेणे, हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावी राबविणे एकात्मिक कीटक व्यवस्थापन करून हिवताप रुग्णांची वाढ रोखणे, जनतेला हिवताप तसेच इतर कीटकजन्य आजारांबाबत आरोग्य शिक्षण देणे हा या मोहिमेचा उद्देश असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीशकुमार टेकाम यांनी सांगितले. ही मोहीम २२ फेब्रुवारी २०२१ पासून सुरू झाली असून, सहा हिवताप दूषित रुग्णांना समूळ उपचार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सामुदायिक सर्वेक्षण मोहीम यशस्वी होण्यासाठी, तसेच या कार्यक्रमात सुसूत्रता आणून संनियंत्रण व मूल्यमापन करण्यासाठी राज्य स्तरावरून राज्यस्तरीय आरोग्य पर्यवेक्षक बी.जी. धुमाळ, एस.बी. पवार उपस्थित आहेत. हिवताप सामुदायिक सर्वेक्षण मोहिमेचा सूक्ष्म कृती आराखडा पर्यवेक्षकीय कामकाज संनियंत्रण व सूक्ष्म नियोजन करण्यासाठी काेटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक बोदेले व नानाजी पिलारे हे सहकार्य करीत आहेत.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during community surveys