नैनपूर येथे शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:37 IST2021-03-18T04:37:03+5:302021-03-18T04:37:03+5:30
देसाईगंज : शहरातील नैनपूर वाॅर्डात मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवरील एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ...

नैनपूर येथे शिबिराचे आयोजन
देसाईगंज : शहरातील नैनपूर वाॅर्डात मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवरील एक दिवसीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून ४२ रुग्णांनी नोंदणी करून आठ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.
शिबिरात सहभागी रुग्णांना प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषधोपचार घेणे, आदींची माहिती दिली. यावेळी शिबिर संयोजक प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची माहिती घेतली तसेच रुग्णांना दारूचे दुष्परिणाम सांगितले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक भारती उपाध्ये यांनी केले. यशस्वीतेसाठी नगरसेविका किरण रामटेके, लालाजी रामटेके, अविनाश बुल्ले, दारूबंदी वॉर्ड संघटनेच्या उषा कुथे व सदस्यांनी सहकार्य केले.