शासकीय गाेदामात रब्बीतील मका खरेदीचे आदेश द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:17+5:302021-05-12T04:38:17+5:30
गडचिराेली : शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्ह्यात शासकीय गाेदामामध्ये सन २०२०-२१ या रब्बी हंगामात मका खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळ ...

शासकीय गाेदामात रब्बीतील मका खरेदीचे आदेश द्या
गडचिराेली : शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन जिल्ह्यात शासकीय गाेदामामध्ये सन २०२०-२१ या रब्बी हंगामात मका खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, अशी मागणी जि. प. सदस्य अतुल गण्यारपवार यांनी केली आहे.
यासंदर्भात ११ मे राेजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गडचिराेली जिल्ह्यात प्रामुख्याने मक्याचे पीक घेतले जाते. मात्र, येथे मका खरेदी करणारे माेठे व्यापारी नाही. काेराेना प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला मका लहान व्यापारी खरेदी करण्यास असमर्थ आहे. रब्बी हंगामात मक्याची खरेदी आधारभूत किंमत याेजनेअंतर्गत शासकीय गाेदामात केली जाते. मात्र अशी मका खरेदी जिल्ह्यात अजूनही सुरू झाली नाही. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता खरीप हंगाम ताेंडावर असून या हंगामासाठी लागणारे कृषी निविष्ठा पैशांअभावी कशा खरेदी कराव्या, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे शासकीय मका खरेदीची सुरुवात लवकर करावी, याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना आदेश द्यावे, असे गण्यारवार यांनी म्हटले आहे.