जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकेतच राहणार शासकीय बँक खातेगडचिरोली : पीक कर्ज वाटपात पुढील काळात उद्दिष्ट एकूण खातेदारांच्या आकडेवारीनुसार बघितले जाईल. आगामी खरीपाच्या तयारीच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांचे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले. राष्ट्रीयकृत बँका कर्ज वाटपाबाबत उदासीन असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.मंगळवारी कुरखेडा पंचायत समिती सभागृहात कोरची व कुरखेडा तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा योजना व वित्त सहाय्य यांचा आढावा घेतला. बैठकीला उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, जिल्हा व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी बाबरे, तहसीलदार ए. पी. चरडे आदी उपस्थित होते.राष्ट्रीयकृत बँकांना जेवढे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे, त्याच्या निम्मेच कर्ज वाटप केले आहे. येणाऱ्या काळात सर्व शासकीय विभागांची बँक खाती पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकेत ठेवण्याचे धोरण अवलंबिले जाईल, असे संकेत दिले. महिला बचतगटांना ७ टक्के व्याजाने कर्ज दिले पाहिजे, एकाच आर्थिक वर्षात पूर्ण रक्कम परतफेड करणाऱ्यांना ३ टक्के व्याजाची रक्कम परत दिली पाहिजे, असा नियम आहे. मात्र सर्व बँका १० ते १२ टक्के व्याज आकारणी करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आकारणी केलेले व्याज परत करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांचे खाते उघडा
By admin | Updated: October 26, 2016 01:49 IST