चारपैकी एकच पॅसेंजर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:30+5:30
देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना साेयीचे हाेत हाेते. मात्र, काेराेनाच्या कालावधीत रेल्वेसेवा ठप्प हाेती. त्यानंतर, आता काही प्रमाणात रेल्वे सुरू झाली असली, तरी काही रेल्वे अजूनही बंदच आहेत.

चारपैकी एकच पॅसेंजर सुरू
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जिल्ह्यातील एकमेव असलेल्या देसाईगंज रेल्वे स्थानकावरून काेराेनापूर्वी चार पॅसेंजर धावत हाेत्या. आता मात्र केवळ एकच पॅसेंजर धावत आहे, तसेच काही एक्स्प्रेस गाड्यांचे थांबेही रद्द करण्यात आले आहेत.
देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असल्याने येथील नागरिकांना देसाईगंजवरूनच पुढचा प्रवास करावा लागताे. देसाईगंज रेल्वे स्थानकावर बऱ्यापैकी प्रवाशी मिळत असल्याने, सर्वच पॅसेंजर व काही एक्स्प्रेसचे थांबेही देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना साेयीचे हाेत हाेते. मात्र, काेराेनाच्या कालावधीत रेल्वेसेवा ठप्प हाेती. त्यानंतर, आता काही प्रमाणात रेल्वे सुरू झाली असली, तरी काही रेल्वे अजूनही बंदच आहेत. सध्या गाेंदिया-बल्लारशहा ही पॅसेंजर सकाळी १० वाजता गाेंदियावरून बल्लारशहाकडे जाते व सायंकाळी ५.३४ वाजता गाेंदियाकडे जाते. याच मार्गाने चालणाऱ्या उर्वरित तीन पॅसेंजर बंद आहेत. मागील एक महिन्यापासून एसटीचाही संप सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे. एकच पॅसेंजर असल्याने या पॅसेंजरमध्ये माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी राहते. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
प्रवाशांच्या खिशाला झळ
काेराेनाच्या कालावधीत शासनाने रेल्वेसेवा बंद ठेवली हाेती. आता मात्र, काेराेनाचे रुग्ण कमी झाले आहेत. सर्वच क्षेत्रातील काम पूर्ववत सुरू झाले आहे. मात्र, शासनाने अनेक पॅसेंजर बंदच ठेवल्या आहेत. पॅसेंजर बंद असण्याबराेबरच एसटीचा संपही सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे. - शरद मेश्राम, नागरिक
दरभंगा, यशवंतपूर-काेरबा एक्स्प्रेसचा थांबा रद्द
देसाईगंज रेल्वे मार्गाने दिवसभरातून अनेक एक्स्प्रेस धावतात. त्यापैकी यशवंतपूर-काेरबा, बिलासपूर-चेन्नई व दरभंगा या तीन एक्स्प्रेसचे काेराेनापूर्वी देसाईगंज येथे थांबे हाेते. आता मात्र, यशवंतपूर-काेरबा, दरभंगा या दाेन एक्स्प्रेसचा देसाईगंज येथील थांबा रद्द करण्यात आला आहे. केवळ बिलासपूर-चेन्नई या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. बिलासपूरवरून चेन्नईकडे जाणारी एक्सप्रेस दुपारी ३ वाजता देसाईगंजात पाेहाेचते, तर चेन्नईवरून बिलासपूरला जाणारी एक्स्प्रेस रात्री ७.४० वाजता देसाईगंज येथे पाेहाेचते.