केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:01+5:30
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला संबंधित तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या इमारतीमध्ये पाठविले जाते.

केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाºया नागरिकांची संख्या घटल्याने संस्थात्मक विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या सुध्दा कमी झाली आहे. आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात रविवारी केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरणात होते.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला संबंधित तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणाच्या इमारतीमध्ये पाठविले जाते.
कामाच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना स्वगावी जाण्याची परवानगी राज्य शासनाने दिल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात येणाºयांचा ओघ वाढला होता. जिल्हाभरातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये जवळपास दीड हजार नागरिक होते. यातील बहुतांश नागरिकांचे कोरोनाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच काही नागरिकांना १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची सुटी करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रात राहणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार केवळ ११५ नागरिक संस्थात्मक विलगीकरण केंद्रांमध्ये आहेत. त्यापैकी २० जणांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले.
सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात पाच प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत. त्या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळल्याने संबंधित क्षेत्राला प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे. यातील काही प्रतिबंधात्मक क्षेत्रांना १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे काही दिवसातच प्रतिबंधात्मक क्षेत्रही हटविले जाण्याची शक्यता आहे.
३ हजार ८३३ नमुने तपासले
कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या तसेच कोरोना प्रभावित जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ३ हजार ८३३ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. ३०८ नागरिकांचे दुबार नमुने घेण्यात आले. ८६ नमुने ट्रू नॅटवरील आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ ९ अॅक्टिव्ह रूग्ण शिल्लक आहेत. एकूण ४८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ३८ जण बरे होऊन परतले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बरेचशे रूग्ण बरे होऊन परतत असल्याने कोरोना विषयी असलेली नागरिकांच्या मनातील भिती कमी झाली आहे.