ऑनलाईन खरेदीत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:54+5:30
बनावट कंपन्यांकडून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेणारे काही कमी नाही. असाच प्रकार आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी येथे घडला. ऑनलाईन खरेदीत ग्राहकाला बंद डब्ब्यात मोबाईलऐवजी कंबरपट्टा मिळाला.

ऑनलाईन खरेदीत फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
वैैरागड : विविध माध्यमातून ग्राहक जागृती केली जात असली तरी बाजारातील बनावट कंपन्यांकडून स्वत:ची आर्थिक फसवणूक करून घेणारे काही कमी नाही. असाच प्रकार आरमोरी तालुक्याच्या देलनवाडी येथे घडला. ऑनलाईन खरेदीत ग्राहकाला बंद डब्ब्यात मोबाईलऐवजी कंबरपट्टा मिळाला.
देलनवाडी येथील अमर भामराज हर्षे यांना कस्टमर केअर क्रमांकावरून वस्तू कमी किमतीत वस्तू देत असल्याच्या ऑफरबाबत फोन आला. ४ हजार ५०० रूपयात १६ हजार रूपयांचा मोबाईल मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार अमर हर्षे यांनी मोबाईलवर वस्तूसाठी आपला पत्ता दिला. या पत्याच्या आधारावर ८ ऑगस्ट रोजी पोस्टामार्फत सीटी सर्विस दिल्ली असा उल्लेख असलेला बंद लिफापा प्राप्त झाला. साडेचार हजार रूपये देऊन हा लिफापा सोडविला. या लिफाप्यात मनी पॉकेट व कंबरपट्टा होता.