नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 03:34 IST2019-05-06T03:33:59+5:302019-05-06T03:34:11+5:30

भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातही हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत.

 One killed by Naxalites | नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

नक्षलवाद्यांकडून एकाची हत्या

भामरागड (गडचिरोली) : भूसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातही हिंसक कारवाया सुरू केल्या आहेत. पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्यांनी एका इसमाची हत्या केल्याची घटना रविवारी
पहाटे तालुक्याच्या मर्दहूर येथे उघडकीस आली. डुंगा कोमटी वेडद (३५, रा. नैनवाडी) असे मृताचे नाव आहे.
लग्नसमारंभासाठी डुंगा वेडद काही गावकऱ्यांसोबत शनिवारी रात्री शेजारच्या मर्दहूर गावात आला होता. भामरागड तालुका मुख्यालयापासून मर्दहूर गाव ३० किमी अंतरावर आहे. तेथून डुंगा याला गावाबाहेर नेऊन नक्षलींनी त्याची हत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे.

Web Title:  One killed by Naxalites