दुचाकी अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 22:05 IST2017-11-24T22:05:22+5:302017-11-24T22:05:38+5:30

भरधाव वेगाने जात असताना दुचाकी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली.

One injured in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात एक जखमी

दुचाकी अपघातात एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : भरधाव वेगाने जात असताना दुचाकी रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली.
चरणदास देशमुख (३२) रा. मौशीचक असे जखमीचे नाव आहे. देशमुख हे एमएच ३३ एल ८०२१ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने आपल्या गावावरून वैरागड मार्गे आरमोरीकडे जात होते. वैरागड येथील भंडारेश्वर मंदिराच्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजुला जाऊन पलटली. यामुळे चरणदास देशमुख हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच लोकमतचे वार्ताहर प्रदीप बोडणे, हार्दिक भैसारे, कविश्वर खोब्रागडे, सुरेंद्र बावणकर यांनी जखमीला वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपाचारासाठी भरती केले. डॉ. विलास वाघधरे यांनी जखमीवर उपचार केले.

Web Title: One injured in a two-wheeler accident