५,६०० नागरिकांसाठी एक शासकीय डॉक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:54+5:30

गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या अतिशय कमी आहे. तसेच खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची येथील नागरिकांची ऐपत नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बहुतांश भार शासकीय आरोग्य यंत्रणेलाच उचलावा लागते. आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी हे सर्वात महत्त्वाचे व रूग्णावर उपचार करणारे पद आहे. मात्र ही पदे रिक्त असल्याचे दिसून येते.

One government doctor for 5,600 citizens | ५,६०० नागरिकांसाठी एक शासकीय डॉक्टर

५,६०० नागरिकांसाठी एक शासकीय डॉक्टर

ठळक मुद्देसरकारी आरोग्य यंत्रणेवरच संपूर्ण भार : वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्वाधिक पदे आहेत रिक्त, पावसाळ्यात सुविधा पुरविताना दमछाक

दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १२ लाख आहे. या लोकसंख्येच्या आरोग्याचा भार २१४ डॉक्टरांना सोसावा लागत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या व सध्या कार्यरत डॉक्टर यांचा विचार केल्यास जवळपास ५ हजार ६०० लोकसंख्येसाठी एक डॉक्टर उपलब्ध असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या अतिशय कमी आहे. तसेच खासगी रूग्णालयात उपचार घेण्याची येथील नागरिकांची ऐपत नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा बहुतांश भार शासकीय आरोग्य यंत्रणेलाच उचलावा लागते. आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी हे सर्वात महत्त्वाचे व रूग्णावर उपचार करणारे पद आहे. मात्र ही पदे रिक्त असल्याचे दिसून येते. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्हा रूग्णालय, गडचिरोलीतील महिला व बाल रूग्णालय, तीन उपजिल्हा रूग्णालये व नऊ ग्रामीण रूग्णालयांचा समावेश आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वर्ग १ ची ३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ७ पदे भरण्यात आली आहेत. सुमारे ३० पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग २ ची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९४ पदे भरली आहेत. तर एक पद रिक्त आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र चालविली जातात. वर्ग १ व २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची १७१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ११३ पदे भरली आहेत. तर सुमारे ५८ पदे रिक्त आहेत. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या विरळ आहे. तसेच बहुतांश गावे जंगलानी व्यापली आहेत. जाण्यासाठी रस्ते नाहीत. अशाही परिस्थितीत काही गावातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी १२ ते १५ किमीचे अंतर गाठावे लागत असल्याचे दिसून येते.
२०१९ मध्ये प्राप्त निधी
२०१९-२० या वर्षात औषधे व इतर साहित्य खरेदीसाठी उपजिल्हा रूग्णालयांना ६३७.९५ लाख, सामान्य रूग्णालयाला ७६३.३४ लाख, महिला रूग्णालयाला ६९१ लाख, ग्रामीण रूग्णालयांना ५७६.११ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्रांना २७२.६६ लाख, उपकेंद्रांना १९९.९९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

 

Web Title: One government doctor for 5,600 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.