कृषी अधिकार्याला एक दिवसाची कोठडी
By Admin | Updated: May 11, 2014 23:38 IST2014-05-11T23:38:07+5:302014-05-11T23:38:07+5:30
चामोर्शी येथील राजेंद्र प्रेमराज राठी नामक प्रभारी तालुका कृषी अधिकार्याला ८० हजार रूपयाची लाच घेतांना शनिवारी त्याच्या कॅम्प एरियातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक

कृषी अधिकार्याला एक दिवसाची कोठडी
गडचिरोली : चामोर्शी येथील राजेंद्र प्रेमराज राठी नामक प्रभारी तालुका कृषी अधिकार्याला ८० हजार रूपयाची लाच घेतांना शनिवारी त्याच्या कॅम्प एरियातील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला अटक करून गडचिरोली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले व पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने राठीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बल्लारशाह येथील शांतीनगर बिल्ट कॉलनीचे रहिवासी ट्रॅक्टर मालक रवींद्र चंद्रय्या एबंडवार यांनी गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत मार्र्कंडा कन्सोबा येथे १६.१९ हेक्टर आर मजगीचे काम केले. या कामाचे २ लाख ७९ हजार ४०९ रूपयाचा धनादेश देण्याच्या कामासाठी चामोर्शी येथील प्रभारी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र प्रेमराज राठी (५७) याने ८० हजार रूपयाची मागणी केली होती. रवींद्र एबंडवार यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे प्रभारी कृषी अधिकार्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सापळा रचून राजेंद्र राठी याला ८० हजार रूपयाची लाच घेतांना पंचासमक्ष गडचिरोली येथील कॅम्प एरियातील त्याच्या निवासस्थानीच रंगेहाथ पकडण्यात आले. राठी याच्या विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.