१३३ गावांसाठी एकच बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:23+5:30

कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किमीच्या अंतरावर परिघात असलेल्या १३३ गावांसाठी बँक आॅफ इंडियाची एकमेव बँक शाखा आहे. अपुऱ्या जागेत या शाखेचा कारभार सुरू असून व्यवहार करण्यासाठी येथे खातेदारांची मोठी गर्दी असते. गेल्या नऊ वर्षांपासून तोकड्या जागेत या बँकेचे कामकाज सुरू आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात दोन किमी अंतरावर ही बँक शाखा आहे.

One bank for 113 villages | १३३ गावांसाठी एकच बँक

१३३ गावांसाठी एकच बँक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील एकूण १३३ गावांसाठी कोरची येथे बँक आॅफ इंडियाची एकमेव शाखा आहे. या शाखेत जवळपास ४० हजार खातेदार आहेत. आर्थिक व्यवहारासाठी या बँक शाखेत प्रचंड गर्दी होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोरची येथे भारतीय स्टेट बँकेची एक नवीन शाखा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
कोरची तालुका मुख्यालयापासून ४० किमीच्या अंतरावर परिघात असलेल्या १३३ गावांसाठी बँक आॅफ इंडियाची एकमेव बँक शाखा आहे. अपुऱ्या जागेत या शाखेचा कारभार सुरू असून व्यवहार करण्यासाठी येथे खातेदारांची मोठी गर्दी असते. गेल्या नऊ वर्षांपासून तोकड्या जागेत या बँकेचे कामकाज सुरू आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात दोन किमी अंतरावर ही बँक शाखा आहे. सदर बँक शाखा शहरात नेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र तसे झाले नाही. अधिकाऱ्यांनी सदर बँक शाखा शहरात भाड्याच्या इमारतीत नेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरची येथे बँक शाखेसमोर बसस्टॉप नाही, आॅटो रिक्षाची व्यवस्था नाही. परिणामी कोरची शहरातून दोन किमी अंतर कापून बँक शाखेत जावे लागते. दरम्यान या मार्गावर छत्तीसगड राज्यातून जड वाहतूक होत असते. परिणामी वाहनांच्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बँक शाखेत जावे लागते. सरपंच संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन २०११ मध्ये येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा म्हणून बँक आॅफ इंडियाची शाखा उघडण्यात आली. मात्र ही शाखा शहरापासून दूर आहे.
१३३ गावांतील जवळपास ४० खातेदारांचे खाते आहेत. यामध्ये रोजगार हमी योजना, जनधन, निवृत्ती वेतन आदींचे खाते आहेत. तसेच ग्रामसभा, व्यवसायिक, कर्मचारी, शेतकरी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींचा खातेदारांमध्ये समावेश आहे.

Web Title: One bank for 113 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक