एका पाठोपाठ एक माओवादी येताहेत शरण ! भूपतीसारख्या नेत्याने आत्मसर्पण केल्यावर १५० जण शस्त्रे ठेवणार खाली ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:42 IST2025-10-17T14:42:10+5:302025-10-17T14:42:48+5:30
Gadchiroli : दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचे प्रवक्ता रुपेश याच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण तुकडी आत्मसमर्पणासाठी निघाली आहे.

One after another, Maoists are surrendering! Will 150 people lay down their arms after a leader like Bhupathi surrenders?
गडचिरोली : दंडकारण्यातील अबूजमाडच्या दाट जंगलात माओवादी चळवळीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भूपतीसारख्या वरिष्ठ नेत्याने आत्मसमर्पण केल्यानंतर आता त्याच्या मार्गावरून प्रेरित होऊन तब्बल दीडशे माओवादी जंगलाच्या बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या माओवाद्यांचे १७ ऑक्टोबर रोजी छत्तीसगडच्या बस्तरमध्ये आत्मसमर्पण होणार असल्याची माहिती आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचे प्रवक्ता रुपेश याच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण तुकडी आत्मसमर्पणासाठी निघाली आहे. यामध्ये अनेक महिला, जनमिलिशियाचे सदस्य आणि स्थानिक कॅडरचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
भूपतीने १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण करून शांततेचा मार्ग स्वीकारला. त्याच्या या निर्णयानंतर जंगलात मोठी खळबळ उडाली असून, संघटनेत वैचारिक नेतृत्वाचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता त्याच्या सहकाऱ्यांनीही शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या घडामोडीवर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, दंडकारण्यात माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाची ही लाट वेग घेत असल्याची सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांची माहिती आहे.