ज्येष्ठांनी फुलणार वृद्धाश्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:09 IST2021-02-18T05:09:27+5:302021-02-18T05:09:27+5:30
निराधार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने वृद्धाश्रम बांधले हाेते. काही दिवस हे वृद्धाश्रम चालविण्यात आले. मात्र २००४ पासून वृद्धाश्रमांना अनुदान ...

ज्येष्ठांनी फुलणार वृद्धाश्रम
निराधार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने वृद्धाश्रम बांधले हाेते. काही दिवस हे वृद्धाश्रम चालविण्यात आले. मात्र २००४ पासून वृद्धाश्रमांना अनुदान देणे शासनाने बंद केले हाेते. तेव्हापासून स्वयंसेवी संस्था थाेडीफार वर्गणी गाेळा करून वृद्धाश्रम चालवित हाेते. मुख्यमंत्र्यांनी वृद्धाश्रमांना पोषण अनुदान सुरू केले. त्यामुळे मातोश्री वृद्धाश्रम, गडचिरोली येथे जिल्ह्यातील निराधार ज्येष्ठांना प्रवेश देणे सोपे झाले आहे. ६० वर्षावरील इच्छुक निराधार व निरोगी ज्येष्ठांना वृद्धाश्रमात प्रवेश देणे सुरू झाले आहे. तहसीलदारांकडून उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्डची झेरॉक्स प्रत व संसर्गजन्य रोग नसल्याबाबतचे डॉक्टरकडून प्रमाणपत्र आणावे, असे संस्थाचालक आणि अधीक्षकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी अधीक्षक निरज कोठारे, संस्थाध्यक्ष डी. डी. साेनटक्के, सचिव सुनील पाेरेड्डीवार, वृद्धाश्रम समिती अध्यक्ष विजय श्रृंगारपवार यांंच्याशी संपर्क साधावा.