चपराळात भाविकांचा महासागर

By Admin | Updated: February 25, 2016 01:09 IST2016-02-25T01:09:04+5:302016-02-25T01:09:04+5:30

चपराळा अभयारण्यात असलेल्या परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपुज्य संत श्री वासुदेव महाराज यांच्या हस्ते

Oceans of the devotees in the sea | चपराळात भाविकांचा महासागर

चपराळात भाविकांचा महासागर

सोहळ्यात गर्दी : कार्तिकस्वामी महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा
आष्टी : चपराळा अभयारण्यात असलेल्या परमपूज्य संत कार्तिकस्वामी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा परमपुज्य संत श्री वासुदेव महाराज यांच्या हस्ते वेदशास्त्रसंपन्न सुधीर पांडे महाराज यांच्या विधीतून करण्यात आली.
यावेळी कार्तिकस्वामी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांनी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी ७ वाजता समाधीचा अभिषेक झाल्यानंतर सात जोडप्यांचे हस्ते होमहवन करण्यात आले. यामध्ये सुधाकर निखाडे, जयरामपूर, पुराम गुरूजी उमरी, रमेश बोटावार चपराळा, दिवाकर कुंदोजवार आष्टी, गंगाधर श्रीरामवार आलापल्ली, अमित गजानन पावडे हिंगणघाट, पेंटूजी येनमपल्लीवार चकदरूर आदी उपस्थित होते. ९ वाजतापासून प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरूवात झाली.
पांडे महाराज यांच्या शास्त्रक्तो विधीने पंडितांच्या उपस्थितीत मंत्रोपचारात दही, तूप, दुध यांनी मूर्तीची आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर १२ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी परमपुज्य संत श्री अंकूशबाबा (बेडीवाले), मुरलीधर महाराज हरणघाट, परमपुज्य संत सुधमचार्य, मौनीजी फलहारी महाराज बैतुल, जानाळा येथील बेडीवाले बाबा व असंख्य पंडित उपस्थित होते. कार्तिकस्वामी महाराजाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आंध्रप्रदेश तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला. १० हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पोलिसांनी मंदिरापासून एक किमी अंतरावरच चारचाकी व दुचाकी वाहन अडवून ठेवले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Oceans of the devotees in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.