सीआरपीएफ जवानांनी घेतली एकतेची शपथ

By Admin | Updated: November 2, 2016 01:20 IST2016-11-02T01:20:02+5:302016-11-02T01:20:02+5:30

राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील सीआरपीएफ बटालियन क्रमांक ९ च्या जवानांनी ३१ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.

The oath of unity by the CRPF jawans | सीआरपीएफ जवानांनी घेतली एकतेची शपथ

सीआरपीएफ जवानांनी घेतली एकतेची शपथ

अहेरी : राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील सीआरपीएफ बटालियन क्रमांक ९ च्या जवानांनी ३१ आॅक्टोबर रोजी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली.
शपथग्रहण समारंभाप्रसंगी कमांडंट राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. या कार्यक्रमात सीआरपीएफ जवान तसेच अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. शपथग्रहण समारंभाप्रसंगी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. देशाची एकता व अखंडता कायम राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. सीआरपीएफ जवान, सी-६० जवान व पोलीस जवान यांच्यामध्ये व्हॉलिबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले. दोन्ही संघाच्या खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The oath of unity by the CRPF jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.