युवक काँग्रेसतर्फे परिचारिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST2021-05-14T04:36:15+5:302021-05-14T04:36:15+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्यावतीने मागील १८ दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्यात येत आहे. याच ठिकाणी बुधवारी ...

युवक काँग्रेसतर्फे परिचारिकांचा सत्कार
जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्यावतीने मागील १८ दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरण करण्यात येत आहे. याच ठिकाणी बुधवारी सकाळी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हाताने रुग्णांच्या नातेवाइकांना भोजन वितरित करण्यात आले. त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे, डाॅ. चंदा कोडवते, डॉ. मेघा सावसागडे व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांचा सत्कार केला.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. चंदाताई कोडवते, रजनिकांत मोटघरे, डॉ.मेघा सावसागडे, गौरव एनप्रेद्दीवार, प्रवीण रहाटे, रहीम लोडिया, संजय चन्ने, फिक शेख, रवी गराडे, अब्दुल्ला लालानी, मोहेश देवानी, इलिया सुरांनी, अमित कडीवाल यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
130521\13gad_6_13052021_30.jpg
===Caption===
परिचारिकांचा सत्कार करताना डाॅ. चंदा काेडवते.