नर्सरी, केजीच्या २३ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:41 IST2021-05-25T04:41:04+5:302021-05-25T04:41:04+5:30

गडचिराेली : काेराेना संकटाच्या महामारीमुळे मागील शैक्षणिक सत्रात वर्षभर नर्सरी व केजीचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण ...

Nursery, KG's 23,000 children at home next year? | नर्सरी, केजीच्या २३ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

नर्सरी, केजीच्या २३ हजार मुलांचे पुढील वर्षही घरातच?

गडचिराेली : काेराेना संकटाच्या महामारीमुळे मागील शैक्षणिक सत्रात वर्षभर नर्सरी व केजीचे वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ही शिक्षण पद्धती लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरली नाही. अजूनही काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आला नसून पुन्हा तिसरी लाट येणार आहे. त्यामुळे गडचिराेली शहर व परिसरातील जवळपास २३ हजार विद्यार्थ्यांना घरी बसण्याची पाळी येऊ शकते.

गडचिराेली शहर व परिसरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा, काॅन्व्हेंटची संख्या जवळपास १६ आहे. या शाळांमध्ये नर्सरी व केजी तसेच पुढील वर्ग भरले नाहीत. अशीच परिस्थिती आरमाेरी शहरातही आहे. आरमाेरी शहरासह जिल्हाभरातील नर्सरी व केजीचे विद्यार्थी काेराेना संसर्गाच्या संकटामुळे घरीच बसले हाेते. अनेक शाळांनी शिक्षकांची संख्या कमी केली. काही कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.

अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी नर्सरी, केजी व इयत्ता पहिलीच्या वर्गात पहिल्यांदाच नवीन शाळेत मुला, मुलींचा प्रवेश घेतला. अनेकांनी पाठ्यपुस्तक घरी आणले. मात्र, संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वर्ग भरले नाहीत. नवीन शाळेत जाण्याचे अनेक विद्यार्थ्यांना कुतूहल हाेते. मात्र, शाळा व वर्ग न भरल्याने यंदा चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण पडले. अनेकांनी शाळाही पाहिली नाही.

काेट...

पालकांनी मुला-मुलींना अधिक वेळ माेबाईल देऊ नयेे. घरच्या घरी किंवा अंगणात छाेटे-माेठे खेळ त्यांच्यासाेबत खेळावे. पाल्यांना पालकांनी वेळ द्यावा. जेणेकरून मानसिकता चांगली राहील.

- डाॅ. मनीष मेश्राम,

फिजिशियन व मानसाेपचार तज्ज्ञ.

..................

काेराेनामुळे इयत्ता चौथीपासूनचे खालचे सर्व वर्ग प्रत्यक्ष भरले नाहीत. विद्यार्थ्यांचे माेठे नुकसान झाले. ऑनलाईन शिक्षण पद्धती राबविण्यात आली. यावर्षी तरी शाळा सुरळीत चालाव्यात.

- मनाेज वनमाळी, संचालक, शिक्षण संस्था, आरमाेरी.

.........................

पालकांकडून पूर्ण शुल्क न मिळाल्याने शिक्षण संस्थांना आर्थिक फटका बसला. प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम झाला. यावर्षी तरी काेराेनाचे संकट दूर व्हावे, जेणेकरून नुकसान हाेणार नाही.

- सुधाकर पराते, संचालक, शिक्षण संस्था, गडचिराेली.

......................

काेराेना महामारीच्या संकटामुळे यावर्षी शाळांमधील लहान वर्ग प्रभावित झाले. आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांना शुल्कामध्ये सवलत दिली. काेराेना संकटामुळे शिक्षण संस्था, पालक व विद्यार्थी या सर्व घटकांचे नुकसान झाले.

- सचिन खाेब्रागडे, संचालक,

शिक्षण संस्था, आरमाेरी

......................

काेराेना संसर्गाच्या समस्येमुळे यावर्षी आमची मुले वर्षभर शाळेत गेली नाहीत. ऑनलाईन माध्यमातून थाेडाफार अभ्यास केला. घरी गृहपाठ करून घेतला. मात्र, शैक्षणिक नुकसान झाले.

- प्रवीण काेवे

...............

काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. परिणामी मुले, मुली घरीच राहिल्याने त्यांचा खाेडकरपणा वाढला. शिस्तीमध्येही फरक पडला. आगामी शैक्षणिक सत्रात काेराेनाचे संकट दूर हाेऊन शैक्षणिक कार्य सुरळीत चालावे, अशी अपेक्षा आहे.

- विलास गेडाम

...................

काॅन्व्हेंटमध्ये मुलींची ॲडमिशन केले. मात्र, काेराेनामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू न झाल्याने मुलीला घरीच राहावे लागले. शाळा न भरल्याने आम्हा पालकासाेबत मुले, मुलीही कंटाळले आहेत. आगामी शैक्षणिक सत्रात नर्सरी व केजीचे वर्ग भरणार काय, हे सांगता येत नाही.

- अरविंद साेनुले.

Web Title: Nursery, KG's 23,000 children at home next year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.